fbpx

नियमावली

1) हॉस्टेलमध्ये प्रवेश घेताना एक रकमी भाडे जमा करावं लागेलं. तसेच रु ५०००/- (पाच हजार रुपये फक्त) अनामी
रक्कम जमा करावी लागेल. कोणत्याही कारणानी होस्टेल मधून सोडून गेल्यास पूर्ण भरलेले भाडे व अनामत रक्कम परत मिळणार नाही.

2) होस्टेलचे सत्र एप्रिल/ में / जुन महिन्यापासून चालू होईल व ११ महिन्याचे राहील.

3) होस्टेलची फी १ ते १० एप्रिल दरम्यान भरणे अनिवार्य आहे. अन्यथा आपला प्रवेश रद्द करण्यात येईल.

4) एक महिन्या पर्यंत कोणत्याही कारणामुळे हॉस्टेलमध्ये गैरहजर राहिल्यास होस्टल प्रवेश रद्द करयात येईल.

5) मुलींनी रात्री ९ वाजेनंतर मोबाईल बंद करून ऑफिसला जमा करण बंधनकारक राहील, तसेच इतर वेळेस मोबाईलवर जोराने गाणे चालविण्यास किला बोलण्यास सकल मनाई आहे. रात्री ९ वाजता नंतर आलेल्या अर्जंट फोनसाठी मुलींनी  कळविण्यात येईल.

6) मुलींनी रात्री ९ वाजे पर्यंत हॉस्टेल मध्ये येणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश देण्यात येणार नाही.

7) मुलींनी प्रत्येक वेळेस हॉस्टेल बाहेर जाताना व आतमध्ये येताना बायोमेट्रिक्स मशिनवर नोंद करण आवश्यक आहे. याची नोंद पालकांना त्यांनी दिलल्या मोबाइल नंबरवर इन्टरनेट द्वारे प्राप्त होईन.

8) बाहेरगावी जाण्याअगोदर पालकांनी व्यवस्थापकाला परवानगी (फोनवर) दिल्यानंतर मुलीनी बाहेरगावी जाण्याच्या रजिष्टरमधे अर्ज करून बाहेरगावच्या फोन नंबर अर्जावर नमूद करावा व परत येतांना पालकांचा अर्ज सोबत आणणेबांधकारक, अर्ज न आनल्यास रु.१००/- दंड आकारण्यात येईल व फॅक्सद्वारे अर्ज स्विकारण्यात येइल, अन्यथा रूममध्ये जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.

9) बाहेरगावी जाताना येतांना मेसमध्ये पूर्व सूचना देणे बंधनकारक राहील.

10) होस्टेलमध्ये पालकांना किंवा नातेवाईकांना थांबण्यास सक्त मनाई आहे.

11) होस्टेलमधील मुलींना भेटण्यासाठी संबधीतांना काऊंटरवर संपर्क साधावा. भेटण्याची वेळ फक्त शनिवार / रविवारी सकाळी १० से ६ पर्यंत राहील. मुलीनीं पालक, स्थानीक पालक व जवळचे नातेवाईक शिवाय दुसन्या कोणीही व्यक्तीला भेटता येणार नाही. भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस स्वत:ची माहिती रजीर्टरमध्ये नोद करावी लागेल.

12) मुलींनी रूम बाहेर जाताना सर्व लाईट, पंखे व नळ बंद करुन जावे अनावश्यक आहे. अनावश्यक विजेचा वापर करू नये, या सूचनेचे पालन करण्यात आले नाही तर रु. १००/- दंड आकारण्यात येईल तसेच मुलीनी आपल्या रूमची चाबी बाहेर जाताना रूम लॉक करून स्वतः जवळ ठेवावी.

13) रूममधील अलमारी कपाटामध्ये जोडे, चपला तसेच अनावश्यक वस्तु ठेवू नये याच वरोबर कोणत्याही वेळेला व्यवस्थापकाकडून रूमचे निरीक्षण केले जाईल.

14) रूममधील स्टडी टेबलवर वजनी सामान ठेयू नये तसेच रूममधील कोणतीही वस्तु तूट फूट झाल्यास त्याची नुकसान भरपाई करावी लागेल.

15) मुलींनी स्वतःच्या सामानाची जबाबदारी स्वतः करायची आहे. त्यासाठी व्यवस्थापक जबाबदार राहणार नाही.

16) व्यवस्थापकांनी परवानगी दिल्या शिवाय कोणीही त्यांना देण्यात आलली रूम बदली करू नये तसेच दुसन्या मुलींनी त्रास होईल असं वर्तन करू नये.

17) जर कोणत्याही मुलीचे वर्तन समाधानकारक नसेल तर पालकांना लगेच माहिती कळविण्यात येईलब होस्टेल सोडण्यासाठीआदेश देण्यात येईल.

18) मुलींनी कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ऑफिस इनचार्ज ला लेखी तक्रार करावी किवा तक्रार पुस्ताकमध्ये नमूद करावी या तक्रारी बाबतचा निर्णय व्यवस्थापकाचा राहील. पालकांनी सुद्धा होस्टेलमध्ये आल्यानंतर फिडबॅक रजिस्टर मध्ये फिडबॅक लिहिणे आवश्यक आहे.

19) होरटेलच्या टेरेसवर जाण्याची सक्त मनाई आहे.

20) मुलीजवळ मोबाइल फोने किंवा स्थानिक नातेवाईकाचा मोबाईल फोन नंबर असल्यास त्या मोबाईलचा नंबर देणे आवश्यक आहे. जेणे करून आवश्यकतेच्या वेळी त्वरित संपर्क करता येईल.

21) मुलींजवळ लॅपटॉप, कॉम्प्युटर असल्यास ऑफिसमध्ये नौद करणे आवश्यक आहे आणि त्याकरीता लागणारे इलेक्ट्रीक चार्जेस वेगळे देणे आवश्यक आहे.

22) मुलींनी ऍडमिशन घेत्यावेळी कोणत्याही मागील दिर्घ आजारासंबंधोधी पूर्ण माहिती व्यवस्थापकास लिहन दयावी. मुलींनी हॉस्टेलमध्ये डॉक्टर/ मेडिकल सूविधा देण्यात येईल व त्याचे चार्जेस वेगळे देणे आवश्यक आहे.

23) LIFT मुलींच्या सोयीसाठी आहे ना कि त्यांच्या वैक्यतीक अधिकारासाठी (लिफ्टमध्ये तांत्रिक अडचण
उद्भवल्यास याबाबतची कोणत्याही प्रकारची तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही.

24) आपआपली वाहने स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावी. तुटफुट किंवा चोरी गेल्यास आपण स्वतः जवाबदार राहणार.

25) AC रूमच्या मुलीना प्रत्येक महिन्याला AC इलेक्ट्रिक चार्जेस (रिडिगप्रमाणे) वेगळे भरावे लागतील.

वरील सर्व नियम मला व माझ्या पाल्याला बंधनकारक राहतील.

Open chat
Chat With Us